
भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेमध्ये सुरू आहे. हा सामना रोमांचक वळणावर असून अखेरचा दिवस निर्णायक आहे.
पाचव्या दिवशी (२४ जून) दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. हा दोन्ही संघांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेतील पहिला सामनाही आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांचे खेळाडू पाचव्या दिवशी दंडाला काळी फित बांधून मैदानात उतरले आहेत.