
इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून (२० जून) सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले,लीड्स येथे खेळवला जात आहे. या सामन्याला काहीशी भावनिक सुरूवातही झाली आहे.
या सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघातील खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते. १२ जून रोजी अहमदाबादमधील मेघाणी नगर परिसरात एअर इंडिया फ्लाइट AI171 (बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर) या प्रवासी विमानाचा अपघात झाला. हे विमान अहमदाबादमधून लंडनला जात होते.