
इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसापूर्वी (२२ जून) माहिती मिळाली की इंग्लंडचे दिग्गज गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स ( David "Syd" Lawrence) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी गंभीर आजाराशी झुंज देताना अखेरचा श्वास घेतला.