Asian Games, Cricket: भारताच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीला होणार सुरुवात! 'या' संघाविरुद्ध क्वार्टर-फायनलचा सामना, पाहा Schedule

Asian Games 2026 Men's Cricket Quarter-Final Live Streaming: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत खेळणारे ८ संघ निश्चित झाले आहेत. या फेरीत भारताचा सामना कोणाविरुद्ध होणार आणि कुठे पाहाता येणार जाणून घ्या.
Team India | Asian Games 2026

Team India | Asian Games 2026

Sakal

Updated on: 

Asian Games Cricket Quarter-Final Fixtures: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत महिलांच्या क्रिकेटनंतर पुरुषांची क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेतील साखळी फेरी पूर्ण झाली असल्याने आता उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या स्पर्धेचे स्वरुप थोडे वेगळे होते. भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना उच्च मानांकन असल्याने त्यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं होतं. मात्र इतर ६ संघात पहिली फेरी झाली असून दोन गटातून चार संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

Team India | Asian Games 2026
Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com