टीम इंडियाचे रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह यांच्यासह अनेक खेळाडूंनी Yo-Yo व DXA फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली.
बीसीसीआयच्या बेंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सेलन्स (CoE) मध्ये ही तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली.
या टेस्टमध्ये मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांचाही समावेश होता.
Team India fitness clearance update BCCI news : रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह यांच्यासह टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंची तंदुरुस्त चाचणी पार पडली आणि त्याचा अहवाल समोर आला आहे. आशिया चषक २०२५ स्पर्धेपूर्वी ही फिटनेस टेस्ट महत्त्वाची होती आणि विशेषतः रोहित या टेस्टमध्ये पास होईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण, रोहितचं वय आणि त्याची २०२७ चा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा याच्या मार्गातील हाच मोठा अडथळा होता.