
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघात रविवारी खेळला जात आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी २५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आता भारताला तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरायचे असेल, तर धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागेल. तसेच न्यूझीलंडला दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरायचे असेल, तर त्यांना भारताला २५१ धावा करण्यापासून रोखावं लागणार आहे.
न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल आणि मायकल ब्रेसवेल यांनी अर्धशतके केली, तर भारतीय फिरकीपटूही चमकले. मात्र या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांकडून अनेकदा झेल सुटले, याचा फायदा न्यूझीलंडला झाल्याचे दिसले.