

Rishabh Pant
Sakal
Why Did Rishabh Pant Miss Out: भारतीय संघाला २७ सप्टेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. याचदरम्यान भारताचा टी२० संघ जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत व्यस्त असणार आहे. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय टी२० संघात असलेल्या खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेले नाही. त्यामुळे भारताच्या वनडे संघात बरेच बदल झाले आहेत.
ऋतुराज गायकवाड, मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे, तर यष्टीरक्षक ध्रुव जुरेललाही संधी मिळाली आहे. याशिवाय आकिब नबी आणि नमन धीर या नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे. मात्र असे असतानाच रिषभ पंतला मात्र संधी न मिळाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.