
भारत - पाकिस्तान या दोन देशातील संबंध आता अत्यंत बिघडली आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळल्याचे दिसले आहे. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत चोख उत्तर दिले.
त्यानंतर पाकिस्तानकडून बुधवारी भारतावर हल्ल्याच्या प्रयत्न झाला. त्याचे भारताकडून प्रत्युत्तरही देण्यात आले. यादरम्यान पाकिस्तानधील विविध ठिकाणी गुरुवारी ड्रोन हल्ले झाल्याचे दिसले. यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमचेही नुकसान झाल्याचे समजले होते.