Axar Patel injury news
esakal
Axar Patel Injury Update India vs Pakistan: भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखली आहे आणि रविवारी त्यांच्यासमोर पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाचा फॉर्म पाहता पुन्हा एकदा पाकिस्तानचे वस्त्रहरण होणार हे निश्चित आहे. पण, त्याआधी एक टेंशन वाढवणारा प्रसंग कालच्या ओमानविरुद्धच्या लढतीत घडला आहे. भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल झेल पकडण्याच्या प्रयत्नात डोक्यावर पडला आणि त्यामुळे त्याने मैदान सोडले. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित असताना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार आहे.