
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचे तिसरे पर्व (२०२३-२५) शनिवारी संपले. दक्षिण आफ्रिकेने लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या अंतिम सामन्यात शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवत तिसऱ्या पर्वाचे विजेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचे तिसरे विजेते ठरले. दरम्यान, त्यांच्या विजयासह तिसरं पर्व संपलं.
आता लगेचच चौथ्या पर्वाला म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. येत्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या चौथ्या पर्वात ९ संघांमध्ये एकूण ७१ सामने खेळले जाणार आहे.