VAIBHAV SURYAVANSHI’S 171 WILL NOT ENTER OFFICIAL U19 RECORD BOOKS
esakal
Why Vaibhav Suryavanshi 171 runs not counted in U19 records? वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा क्रिकेटचे मैदान दणाणून सोडले. त्याने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात संयुक्त अरब अमिराती ( UAE) संघाची धुलाई केली. वैभवने ९५ चेंडूंत ९ चौकार व १४ षटकारांसह १७१ धावा केल्या. त्याला आरोन जॉर्ज व विहान मल्होत्रा यांच्या अर्धशतकांची साथ मिळाली आणि भारताने ५० षटकांत ६ बाद ४३३ धावांपर्यंत मजल मारली. १९ वर्षांखालील वन डे सामन्यातील ही तिसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. वैभवनेही १७१ धावांची विक्रमी खेळी केली, परंतु त्याच्या या विक्रमाची नोंद १९ वर्षांखालील रेकॉर्ड बूकमध्ये करता येणार नाही.. जाणून घेऊयात या मागचं कारण...