

Arjun Rajput | U19 Asia Cup 2026 | India vs Pakistan
Sakal
U19 Asia Cup 2026, India vs Pakistan: रविवारी (८ नोव्हेंबर) १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन युवा संघात सामना होत आहे. साखळी फेरीतील दोन्ही संघांचा हा सामना असून विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीत स्थान पक्के करणार आहे.
त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असून भारताने पाकिस्तानसमोर २०९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून अर्जुन राजपूतने (Arjun Rajput) एकाकी झुंज दिली. त्याने शतक ठोकल्याने भारताला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहचता आले.