Kuldeep Yadav ICC ranking drop after Australia T20I series
esakal
Kuldeep Yadav ICC ranking drop after Australia T20I series : भारतीय संघातील फिरकीपटू कुलदीप यादव याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-२० मालिकेतून मध्येच बाहेर करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी त्याला ट्वेंटी-२० संघातून रिलीज केले गेले आहे. त्याचा फटका त्याला ताज्या आयसीसी ट्वेंटी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बसला आहे. त्याची पाच स्थानांनी घसरण झाली असून तो टॉप १० मधून बाहेर पडला आहे.