India T20 World Cup 2026 squad announced
esakal
Team India 20 World Cup 2026 Squad Announced: पुढच्या वर्षी भारत व श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) व कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांच्या उपस्थितीत मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात ही घोषणा केली गेली. भारताच्या ट्वेंटी-२० संघात मोठा बदल पाहायला मिळाला. सूर्या व उप कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) यांच्या फॉर्मवरून टीम इंडिया चिंतीत होती आणि निवड समितीने धाडसी निर्णय घेतला. गिलला संघातून वगळले.