

India vs West Indies ODI squad latest update: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) बुधवारी संघ जाहीर केले. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) स्थानाबाबत बरीच चर्चा रंगली होती, परंतु सीनियर खेळाडूचे संघातील स्थान कायम राहिले. पण, हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्याने आणखी एका मालिकेला मुकला आहे. जसप्रीत बुमराहला आशियाई स्पर्धेसाठीच्या संघातील समावेशामुळे विंडीजविरुद्धच्या मालिकेत निवडलेले नाही. ऋतुराज गायकवाडचे एका वर्षानंतर वन डे संघात पुनरागमन झाले आहे.