

Team India Arrives in New Zealand for 5-Match T20 Series
Sakal
New Zealand vs India T20I Series: भारतीय टी२० संघ न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे पोहचला आहे. दोनच दिवसापूर्वी १७ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली होती. त्यानंतर लगेचच भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला होता. आता सोमवारी भारतीय संघ ख्राईस्टचर्च येथे आला असून २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळेल.
खरंतर भारताचा हा न्यूझीलंडचा दौरा जवळपास दीड महिन्याचा असून यात ५ टी२० सामने, ५ वनडे सामने आणि २ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. टी२० मालिकेने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात होणार असल्याने आधी टी२० संघातील खेळाडू न्यूझीलंडला पोहोचले आहेत.