
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
आशियाई क्रिकेट करंडकाला ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे सुरुवात होणार आहे. भारतीय संघ पहिल्यांदाच गेल्या १८ वर्षांमध्ये प्रतिष्ठेच्या अन् मोठ्या स्पर्धेत सहभागी होत असताना विराट कोहली व रोहित शर्मा या दिग्गज व अनुभवी खेळाडूंविना मैदानात उतरणार आहे.
पुण्यातून दुबईला निघताना गणपती विसर्जन चालू होते. याच कारणामुळे विमानतळावर कसे पोहोचायचे, याची थोडी धाकधूक होती. पुणे मेट्रोमुळे चिंता मिटली. मेट्रोमधून प्रवास करीत असताना मिरवणूक बघत मी वेळेवर पुणे विमानतळावर पोहोचलो.