

Team India
Sakal
India tour of Ireland Schedule: भारतीय क्रिकेट संघ आयपीएल २०२६ स्पर्धा संपल्यानंतरही बराच व्यस्त असणार आहे. भारताला आयपीएलनंतर जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात १ ते १९ जुलै दरम्यान पाच टी२० आणि ३ वनडे सामने खेळायचे आहेत.
पण त्यापूर्वी आता भारतीय संघ (Team India) आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला दोन टी२० सामने (T20I Series) खेळायचे आहेत. या दौऱ्याकडे इंग्लंड दौऱ्याची तयारी म्हणून पाहिले जाईल. आयर्लंड दौऱ्याचे वेळापत्रक शनिवारी (२१ मार्च) बीसीसीआयने जाहीरे केले.