India U19 celebrate after winning the Youth ODI series against Australia U19
esakal
भारताच्या १९ वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून वन डे मालिका ३-० ने जिंकली.
वेदांत त्रिवेदी (८६), राहुल कुमार (६२) आणि विहान मल्होत्रा (४०) यांच्या खेळीमुळे भारताने २८० धावा केल्या.
खिलान पटेलने ४, उधव मोहनने ३ आणि कनिष्क चौहानने २ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला ११३ धावांत गुंडाळले.
India U19 beat Australia U19 to win youth ODI series : भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका ३-० अशी जिंकली. वैभव सुर्यवंशीने दोन खणखणीत षटकार खेचून सुरूवात चांगली केली होती, परंतु तो मोठी खेळी करू शकला नाही. पण, अन्य फलंदाजांनी उत्तम सांघिक खेळ करून भारताला तिसऱ्या वन डे सामन्यात १६७ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.२८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ ११३ धावांवर गडगडला.