
भारतीय क्रिकेटमधील अनेक संघ पुढील दोन महिन्यात इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खेळताना दिसणार आहे. पुढच्या माहिन्यात भारताचा कसोटी संघ ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यांच्यापाठोपाठ लगेचच जून महिन्यातच भारताचा १९ वर्षांखालील संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात ५ वनडे आणि दोन चारदिवसीय सामने भारतीय १९ वर्षांखालील संघाला १९ वर्षांखालील इंग्लंड संघाविरुद्ध खेळायचे आहेत. त्याआधी एक ५०-५० षटकांचा सराव सामना होणार आहे. २४ जून ते २३ जुलै यादरम्यान हे सामने होणार आहेत. इंग्लंडच्या या दौऱ्यासाठी १९ वर्षांखालील भारतीय संघाची घोषणा झाली आहे.