
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा २५ मे रोजी संपणार आहे. या स्पर्धेनंतरही भारतीय खेळाडू क्रिकेटमध्ये व्यस्त असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी जूनमध्ये इंग्लंड दौरा करणार आहे.
तसेच भारताचा महिला संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इतकेच नाही, तर आता भारताचा १९ वर्षांखालील भारतीय संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याचे समजत आहे.