Injury Replacements in India U19 Squad : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २० जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे आणि त्याचवेळी भारताचे १९ वर्षांखालील संघ, महिला संघ, मिश्र दिव्यांग संघही इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे. सर्वांचे लक्ष शुभमन गिलच्या संघाकडे असणार आहे आणि पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. १९ वर्षांखालील संघातही आयपीएल गाजवणारे युवा खेळाडू आहेत आणि या दौऱ्यावर ते कसे खेळतात याची उत्सुकता आहे. दरम्यान, या मालिकेपूर्वी भारताला धक्का बसला आहे आणि दोन खेळाडू जखमी झाले आहेत.