१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत ७ विकेट्सने विजय मिळवला. अभिज्ञान कुंडू आणि वेदांत त्रिवेदी यांच्या नाबाद शतकी भागीदारीमुळे भारताने सहज विजय मिळवला. भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली..१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाची १९ वर्षांखालील ऑस्टेलियाविरुद्ध वनडे मालिकेची सुरुवात दणदणीत झाली आहे. रविवारी (२१ सप्टेंबर) झालेल्या पहिल्या वनडेत भारतीय संघाने ७ विकेट्सने मोठा विजय मिळवला असून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या विजयात यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडू आणि वेदांत त्रिवेदी यांनी मोलाचा वाटा उचलला..U19 IND vs AUS: आयुष म्हात्रे कर्णधार, वैभव सूर्यवंशीलाही टीम इंडियात संधी; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या 'यंगिस्तान'ची घोषणा.या सामन्यात ऑस्ट्रिलियाने भारतासमोर २२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. २०० धावांच्या वरती जरी हे लक्ष्य असले, तरी भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ करत फक्त ३०.३ षटकातच ३ विकेट्स गमावत २२७ धावा करून हे लक्ष्य पार केले. वेदांत आणि अभिज्ञान यांनी नाबाद शतकी भागीदारी साकारली..भारताकडून कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी हे सलामीला फलंदाजीला आले होते. वैभवने सुरुवातीलाच फटकेबाजीला सुरुवात केली, दुसऱ्या बाजूने आयुष त्याला संयमी फलंदाजी करत साथ देत होता. वैभवच्या फटकेबाजीमुळे त्यांनी सलामीलाच अर्थशतकी भागीदारी केली. पण वैभवला ५ व्या षटकात हेडन शिलरने बाद केले. वैभवने २२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ३८ धावा केल्या. तसेच त्यानंतर दोन चेंडूंनंतर सहाव्या षटकात आयुषही ६ धावांवर बाद झाला. त्याला चार्ल्स लचमुंडने बाद केले. विहान मल्होत्राही या सामन्यात फार काळ टिकू शकला नाही. त्याला १० व्या षटकात ९ धावांवर चार्ल्स लचमुंडनेच बाज केले..यानंतर मात्र वेदांत आणि अभिज्ञान यांची जोडी जमली. या दोघांनीही नंतर विकेट्स जाऊ दिल्या नाहीत आणि आक्रमक खेळ करत वैयक्तिक अर्धशतकेही केली. अभिज्ञानने स्फोटक खेळ केला होता, त्याला वेंदात चांगली साथ देत होता. अखेर ३१ व्या षटकात या दोघांनी भारताला विजयापर्यंत पोहचवले. वेदांत आणि अभिज्ञान यांच्याच १५२ धावांची चौथ्या विकेटसाठी नाबाद भागीदारी झाली. वेदांतने ६९ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ६ धावा केल्या. अभिज्ञानने ७४ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ८७ धावा केल्या..IND vs OMN Live: स्वप्न पाहिलेलं २००चं, पण...! Sanju Samson उभा राहिला; अभिषेक, तिलक, अक्षर यांचे योगदान; सूर्या आलाच नाही.तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २२५ धावा केलेल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जॉन जेम्सने दमदार फलंदाजी करताना नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याने ६८ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ७७ धावांची नाबाद खेळी केली. तसेच टॉम होगनने ८१ चेंडूत ४१ धावा केल्या. तसेच स्टीव्हन होगनने ३९ धावा केल्या. बाकी कोणाला खास काही करता आले नाही.भारताकडून गोलंदाजी करताना हेनिल पटलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच किशन कुमार आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. आरएस अंब्रिशने १ विकेट घेतली..FAQsप्र.१: भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या वनडेत किती फरकाने पराभूत केले?➤ भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला.(India won the first ODI by 7 wickets.)प्र.२: भारतासाठी सर्वाधिक धावा कोणी केल्या?➤ अभिज्ञान कुंडूने सर्वाधिक ८७ नाबाद धावा केल्या.(Abhigyan Kundu scored the highest with 87* runs.)प्र.३: भारताच्या विजयात महत्त्वाची भागीदारी कोणाची झाली?➤ अभिज्ञान कुंडू आणि वेदांत त्रिवेदी यांनी १५२ धावांची भागीदारी केली.(The key partnership was 152 runs between Kundu and Trivedi.)प्र.४: गोलंदाजीत भारताकडून कोण चमकला?➤ हेनिल पटलने ३ विकेट्स घेतल्या.(Henil Patel took 3 wickets for India.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.