Vaibhav Suryavanshi
esakal
भारत U19 संघ ऑस्ट्रेलियात दुसऱ्या वन डे सामन्यात खेळला.
वैभव सूर्यवंशीने ६८ चेंडूत ७० धावा केल्या, ५ चौकार व ६ षटकारांसह.
वैभव व विहान मल्होत्रा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली.
India U19 vs Australia U19 match highlights Brisbane 2025 : आयपीएल २०२५ मधून प्रसिद्धझोतात आलेल्या वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाचे मैदान गाजवले. भारताचा १९ वर्षांखालील मुलांचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि दुसऱ्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वैभवने ऑस्ट्रेलियान गोलंदाजांना चोप दिला आहे. त्याने ७० धावांची खेळी करताना ५ चौकार व ६ षटकारांचा पाऊस पाडला आणि संघाला २० षटकांत १२४ धावांपर्यंत पोहोचवले.