

Shubman Gill | India vs Afghanistan
Sakal
IND vs AFG, 1st ODI: भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (१३ जून) अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात दणदणीत विजय मिळवला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ७ विकेट्सने पराभूत करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघा़डी घेतली आहे.
भारताच्या विजयात कर्णधार शुभमन गिलसह पदार्पणवीर गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांनी मोलाचा वाटा उचलला. तसेच केएल राहुलने फिनिशरची भूमिका चोख पार पाडली. पावसाचा अडथळा आल्याने हा सामना २५-२५ षटकांचा झाला होता.