

India vs Afghanistan
Sakal
IND vs AFG 1st ODI Dharamshala: भारत आणि अफगाणिस्तान संघात वनडे मालिकेतील पहिला सामना आज (शनिवारी, १३ जून) खेळवला जात आहे. हा सामना धरमशाला येथे होत असून या सामन्यापासून दोन्ही संघ आगामी वनडे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेसाठी तयारी करताना दिसतील.
मात्र, या सामन्यात पावसाचा मोठा अडथळा आल्याने जवळपास ४ तास सामन्याला उशीर झाला. दुपारी १ वाजता होणारी नाणेफेक संध्याकाळी ५.१५ वाजता झाली. त्यामुळे सामन्यातील षटके कमी करण्यात आली आहेत.