

India vs Afghanistan 2nd T20I
Sakal
Afghanistan vs India 2nd T20I: पहिला टी-२० सामना लिलया जिंकल्यानंतर आज मंगळवारी (ता. १५) होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दमदार कामगिरी करीत सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने पाहुणा भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
टी-२० मध्ये विश्वविजेता असलेल्या भारताने येथेच झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जवळपास सर्वच आघाड्यांवर प्रभावी कामगिरी केली. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि सलामीवीर अभिषेक शर्मा यांनी शानदार कामगिरी करत भारताच्या विजयाचा पाया रचला.