

India T20I Team
Sakal
India vs Afghanistan T20I Series: भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात १३ सप्टेंबरपासून तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी दीड आठवड्यांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा झाली आहे. मात्र संघाची घोषणा करतानाच चार खेळाडूंच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह होते.
आता याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली असून भारतीय संघासाठी (Team India) अद्याप चिंता मिटलेली नाही, तरी अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीबाबत (Nitish Kumar Reddy) मात्र भारताला दिलासा मिळाला आहे.