IND vs AFG Test: भारताने केला डाव घोषित, अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर! गिल, राहुल, पंत, सुदर्शनसह वॉशिंग्टनचीही 'सुंदर' खेळी

India vs Afghanistan Test: भारत आणि अफगाणिस्तान संघात कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने पहिला डाव घोषित केला आहे. यावेळी भारताने अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर उभा केला.
India vs Afghanistan

India vs Afghanistan

Sakal

Updated on

India vs Afghanistan Test, 1st Innings: भारत आणि अफगाणिस्तान संघात सध्या मुल्लनपूरमध्ये शनिवारपासून कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांचे वर्चस्व राहिले असून भारताने जवळपास दीड दिवस फलंदाजी करत साडेपाचशे धावांचा टप्पा सहज पार केला आहे.

भारतासाठी कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि उपकर्णधार केएल राहुलने (KL Rahul) शतक केले. याशिवाय साई सुदर्शन (Sai Sudharsan) आणि रिषभ पंतनेही (Rishabh Pant) मोठ्या खेळी केल्या. यावेळी अफगाणिस्तानला खराब क्षेत्ररक्षणाचाही फटका बसला. पण असे असतानाच अफगाणिस्तानचा गोलंदाज सलीम साफीने (Saleem Safi) सर्वांनाच प्रभावित करत विकेट्स घेतल्या.

India vs Afghanistan
IND vs AFG,Test: केएल राहुल, शुभमन गिलचं खणखणीत शतक, सुदर्शन-पंतचीही दमदार फिफ्टी; पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com