

India vs England T20I
Sakal
England vs India, 5th T20I: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सध्या इंग्लंडमध्ये टी२० मालिका खेळत असलेला भारताचा संघ संघर्ष करताना दिसत आहे. भारताला अद्याप इंग्लंडमध्ये या टी२० मालिकेत एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे मालिकाही गमवावी लागली आहे.
इंग्लंडने पहिल्यांदाच भारताविरुद्ध दोन सामन्यांपेक्षा अधिक सामने झालेल्या टी२० मालिकेत विजय मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आता ५ सामन्यांच्या या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.