IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

India vs England 1st T20I: भारतीय संघाने इंग्लंडसमोर पहिल्या टी२० सामन्यात खराब सुरुवातीनंतरही मोठे लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले आहे. भारतासाठी अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके केली.
Abhishek Sharma - Shreyas Iyer | India vs England T20I

Abhishek Sharma - Shreyas Iyer | India vs England T20I

Sakal

Updated on

England vs India 1st T20I: इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारी (१ जुलै) टी२० मालिकेतील पहिला सामना चेस्टर-ले-स्ट्रीट येथे होत आहे. या सामन्यात भारताकडून अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर (Abhishek Sharma - Shreyas Iyer) यांनी अफलातून फलंदाजी करताना अर्धशतके केली.

रिमझिम पावसात फलंदाजी करताना भारतीय संघाने इंग्लंडसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विशेष म्हणजे १८४ पेक्षा अधिक धावा केल्यानंतर भारतीय संघ कधीही इंग्लंडविरुद्ध टी२० सामना पराभूत झालेला नाही. त्यामुळे भारतीय संघ हाच इतिहास कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंड या इतिहास बदलण्याचा प्रयत्न करेल.

Abhishek Sharma - Shreyas Iyer | India vs England T20I
IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com