IND vs IRE, 1st T20I : वैभव सूर्यवंशीला ऐतिहासिक पदार्पणाची आस, पण पावसाची सामन्यात 'फिल्डिंग'? कसं असेल हवामान, घ्या जाणून

India vs Ireland 1st T20I Rain Updates: भारत आणि आयर्लंड संघात आज पहिला टी२० सामना होणार असून वैभव सूर्यवंशी पदार्पण करण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी हवामान कसं असेल, जाणून घ्या.
India vs Ireland T20I

India vs Ireland T20I

Sakal

Updated on

India vs Ireland 1st T20I Weather Updates: भारतीय संघाच्या आयर्लंड दौऱ्याला आज (शुक्रवारी, २६ जून) सुरुवात होत आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. २०२६ टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ही भारताची पहिलीच टी२० मालिका आहे.

या मालिकेपासून आता दोन वर्षांनी होणाऱ्या टी२० वर्ल्ड कप २०२८ आणि ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू होईल. याशिवाय या मालिकेपासून श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाचा कार्यकाळही सुरू होईल.

भारतीय संघाच्या निवड समितीने सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) टी२० संघातून बाहेर केल्यानंतर श्रेयस अय्यरकडे भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद (T20I Captaincy) देण्यात आले आहे. तसेच तिलक वर्माकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ही मालिका इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी होत असल्याने त्या मालिकेचा सराव म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.

India vs Ireland T20I
IND vs IRE: M.Tech साठी परदेशात गेला अन् थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहोचला; आता भारताविरुद्ध खेळणारा जय मुंद्रा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com