

India T20I Team
Sakal
India vs Japan T20I Match: भारतीय क्रिकेट संघाने आत्तापर्यंत अनेक देशांमध्ये क्रिकेट सामने खेळले आहेत. आता भारतीय संघ जपानमध्ये ऐतिहासिक टी२० सामना खेळणार आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि जपान क्रिकेट असोसिएशन (JCA) यांनी घोषणा केली आहे.
हा सामना भारत-जपान राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचा शुभारंभ करण्यासाठी खेळवला जाईल. हा सामना दोन्ही देशांच्या पुरुष संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा दोन्ही पुरुष संघातील पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना असणार आहे.