
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा गेल्या काही दिवसांपासून सुरू असून आता रविवारी अंतिम सामना होईल. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी प्रभावित केले आहे. अशातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने फेब्रुवारी २०२५ महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर केली आहेत.
आयसीसीने महिला आणि पुरुष अशा दोन्ही विभागात नामांकन मिळवलेल्या खेळाडूंनी नावे घोषित केली. यामध्ये भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलचाही समावेश आहे.