IND vs NZ, 1st ODI: आधी अर्शदीपचा तिखट मारा अन् मग विराट कोहलीची वादळी फिफ्टी! भारताची विजयासह वनडे मालिकेची दणक्यात सुरुवात

India beat New Zealand in 1st ODI: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने या विजयासह मालिकेत आघाडी घेतली. भारताच्या विजयात अर्शदीप सिंग आणि विराट कोहली यांनी मोलाचा वाटा उचलला.
Virat Kohli - Shubman Gill | India vs New Zealand 1st ODI

Virat Kohli - Shubman Gill | India vs New Zealand 1st ODI

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 1st ODI: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका जिंकल्यानंतर वनडे मालिकेची सुरुवातही विजयासह दणक्यात केली आहे. ऑकलंडला बुधवारी (४ नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड संघात पहिला वनडे सामना झाला.

पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्याच भारताने ५ विकेट्सने सामना जिंकला. अर्शदीप सिंगसह (Arshdeep Singh) भारतीय गोलंदाजांनी या विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनीही चांगली फलंदाजी केली.

Virat Kohli - Shubman Gill | India vs New Zealand 1st ODI
IND vs NZ, ODI: अर्शदीप सिंगने १२ वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये करून दाखवली शमीसारखी कामगिरी! असा पराक्रम करणारा तिसराच भारतीय पेसर
Loading content, please wait...