

Team India
Sakal
New Zealand vs India 3rd ODI Rain Update: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना सेडन पार्क, हेमिल्टन येथे मंगळवारी (१० नोव्हेंबर) पार पडणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा महत्त्वाचा सामना आहे. कारण याआधीचे दोन्ही सामने भारताने जिंकले असल्याने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
त्यामुळे तिसरा सामनाही जिंकला, तर भारतीय संघ ही मालिकाही जिंकणार आहे. न्यूझीलंडला मालिका वाचवण्यासाठी विजयाचीच गरज आहे. त्यामुळे तिसरा सामना रोमांचक असेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.