आशिया कप २०२५ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईत होत आहे. पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकली आहे.दोन्ही संघांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही..रविवारी (१४ सप्टेंबर) आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना होत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. दरम्यान, या सामन्याला वादाची आणि भावनिक किनार आहे. भारतातून सामन्याला कडाडून विरोध झाल्यानंतर हा सामना खेळवण्यात येत आहे. त्यामुळे या सामन्यावर सर्वांचे लक्ष आहे..Asia Cup, IND vs PAK: भारताने शेवटच्या क्षणी पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला तर काय होईल? सुपर-४ मध्ये प्रवेश मिळेल का?.पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध बिघडले आहेत. त्यामुळे भारतातून हा सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी होत होती. परंतु, भारत सरकारकडून मिळालेल्या परवानगीनंतर हा सामना होत असून पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकली आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान अली आघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे..नाणेफेक जिंकल्यानंतर सलमान आघाने म्हटले की त्याच्या संघाला इथे खेळण्याचा अनुभव असल्याने संघावर विश्वास आहे. तसेच भारताला प्रथम गोलंदाजीच करायची होती, असं नाणेफेकीनंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले. त्यामुळे नाणेफेक हरल्यानंतरही भारताला प्रथम गोलंदाजी करायला मिळणार आहे.तसेच दोन्ही संघांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेले नाही. आपापल्या पहिल्या सामन्यातील विजयी प्लेइंग इलेव्हनच दोन्ही संघांनी कायम केले आहेत. त्यामुळे अर्शदीप सिंग या सामन्यातही भारताकडून खेळताना दिसणार नाही..Ind Vs Pak Asia Cup 2025 : भारताची चिंता वाढली! सरावादरम्यान शुभमन गिलच्या हाताला दुखापत, पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार?.असे आहेत प्लेइंग इलेव्हन:भारत - अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन(यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्तीपाकिस्तान - साहिबजादा फरहान, सैम अयुब, मोहम्मद हॅरिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद.आमने-सामने आकडेवारीभारत आणि पाकिस्तान संघ आशिया कप स्पर्धेत आत्तापर्यंत १८ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील १० सामने भारताने, तर ६ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. दोन सामन्यांचा निकाल लागलेला नाही. तसेच गेल्या १० वर्षात तर भारतीय संघाचेच वर्चस्व पाकिस्तानवर राहिले आहेत.भारत आणि पाकिस्तान २०२४ टी२० वर्ल्ड कपनंतर दोन्ही संघात अनेक बदल झाले असून प्रशिक्षकांपासून कर्णधारांपर्यंत बदल झाले आहेत. त्यामुळे आता आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे..FAQsप्रश्न १: भारत-पाकिस्तान सामना कुठे खेळला जात आहे?उत्तर: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर.(Where is the India vs Pakistan match being played?)प्रश्न २: नाणेफेक कोण जिंकला?उत्तर: पाकिस्तान कर्णधार सलमान अली आघाने नाणेफेक जिंकली.(Who won the toss?)प्रश्न ३: भारताने प्रथम काय करायचं ठरवलं होतं?उत्तर: भारताला प्रथम गोलंदाजीच करायची होती.(What was India’s preference?)प्रश्न ४: या सामन्यात अर्शदीप सिंग खेळतोय का?उत्तर: नाही, अर्शदीपला या सामन्यात संधी मिळालेली नाही.(Is Arshdeep Singh playing this match?)प्रश्न ५: भारत-पाकिस्तान आशिया कपमध्ये किती वेळा आमनेसामने आले आहेत?उत्तर: १८ वेळा – भारताने १०, पाकिस्तानने ६ सामने जिंकले.(How many times have India and Pakistan met in Asia Cup?)प्रश्न ६: भारताचा कर्णधार कोण आहे?उत्तर: सूर्यकुमार यादव भारताचा कर्णधार आहे.(Who is India’s captain?).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.