
पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातला हा पहिलाच क्रिकेट सामना
१४ सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार लढत
IND vs PAK लढतीकडे चाहत्यांनी फिरवली पाठ
India Pakistan cricket rivalry losing fan interest? : आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान या सामन्याचीच सर्वांना उत्सुकता आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा... पुलवामा हल्ल्यानंतर भारताने शेजाऱ्यांसोबत क्रिकेट खेळू नये अशी मागणी जोर धोरत होती. बीसीसीआयने मात्र बहुदेशीय स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास कोणतीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तरी भारत-पाकिस्तान सामन्याला मोठा प्रतिसाद मिळेल, असे वाटले होते. पण, १४ सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्याच्या तिकिटांची अद्याप विक्री झालेली नाही.