Andy Pycroft avoided major embarrassment for Pakistan captain Salman Agha
esakal
Andy Pycroft’s role in no handshake controversy IND vs PAK : झिम्बाब्वेचे माजी खेळाडू आणि सध्याचे आयसीसीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट हे सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शत्रू असल्याचे चित्र रंगवले जात आहे. PCB ने त्यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( ICC) अनेक तक्रारी केल्या. भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तानची चिडचिड झाली. त्यांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली. पण, या प्रकरणात नवे वळ आले आहे आणि अँडी पायक्रॉफ्ट यांनी खरं तर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याची जगासमोर लाज जाण्यापासून वाचवली.