

Yashvir Goud Reveals India U19 Celebration After Pakistan Win
esakal
Yashvir Goud Reveals India U19 Celebration After Pakistan Win: आशिया कप अंडर-१९ स्पर्धा भारतीय संघाने जिंकली आहे. भारतीय संघाने नवव्यांदा पाकिस्तानला हरवत हा किताब आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात भारतीय संघाने अत्यंत रोमांचक सामन्यात विजय मिळवला.
झालं असं की, भारतीय संघ एके काळी संकटात सापडला होता. ३३८ धावांचं लक्ष्य भारतीय संघासमोर होतं. मात्र, भारतीय संघाची अवस्था २५२ धावांवर ८ बाद अशी झाली होती. तरीही भारतीय संघाच्या फलंदाजांनी या थरारक सामन्यात पाकिस्तानचा एका विकेटने पराभव केला आणि १९ वर्षांखालील आशिया कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.