
WCL मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर अनिश्चिततेचं सावट
वेस्ट इंडिजवर विजय मिळवून भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल
या वादात प्रायोजकांनी घेतली माघार
India vs Pakistan semifinal clash in WCL 2025 hangs in balance : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून रणकंदन पेटले असताना विरोधकांनी संसदेत गोंधळ घातलेला पाहायला मिळाला. पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट अधिक तीव्र झाली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL 2025) स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातल्या साखळी फेरीतील सामन्यावर भारतीय खेळाडूंनी बहिष्कार टाकला होता. आता शेजारी पु्न्हा उपांत्य फेरीत समोरासमोर आले आहेत आणि त्यामुळे भारतीय खेळाडू पुन्हा न खेळण्याच्या भूमिकेत आहेत. पण, याचा फायदा पाकिस्तानलाच होणार आहे.