T20 WC, IND vs SA: अक्षर पटेलला संधी नाहीच; दक्षिण आफ्रिका संघात तब्बल ४ बदल; Super-8 सामन्यासाठी पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

India vs South Africa Toss & Playing XI: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात अहमदाबादला सुपर-८ चा सामना होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आहे.
India vs South Africa

India vs South Africa

Sakal

Updated on

T20 World Cup 2026, IND vs SA, Playing XI: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर-८ मधील आपल्या मोहिमेची सुरुवात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करणार आहे. रविवारी (२२ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना होणार आहे.

दोन्ही संघ आत्तापर्यंत या स्पर्धेत अपाराजित आहेत. पहिल्या फेरीत दोन्ही संघांनी सर्व चार सामने जिंकून आपापल्या गटात अव्वल क्रमांक मिळवला होता. आता या सामन्यानंतर कोणत्या संघाचा विजयी रथ रोखला जाणार हे पाहावे लागणार आहे.

<div class="paragraphs"><p>India vs South Africa</p></div>
Ind vs SA T20 World Cup : दोन देशच नाही, तर दोन भाऊ आमनेसामने, मैदानाबरोबरच डगआऊटमध्ये रंगणार सामना
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com