

Rishabh Pant | Sri Lanka vs India 2nd Test
Sakal
Sri Lanka vs India, 2nd Test Marathi News: भारत आणि श्रीलंका संघात सध्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कोलंबोमध्ये सुरू आहे. पण या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व ठेवलं असलं तरी खेळाडूंच्या दुखापतींनी मात्र चिंता वाढवल्या आहेत. पहिल्याच दिवशी रिषभ पंत (Rishabh Pant) मनगटाला चेंडू लागल्याने रिटायर्ड हर्ट (Retired Hurt) झाला होता, पण नंतर दुसऱ्या दिवशी त्याने मैदानात येत अर्धशतकी खेळी केली.
परंतु, या सामन्यात पहिल्या डावात तो यष्टीरक्षणासाठी उतरलेला नाही. ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) यष्टीरक्षण (Wicket-Keeping) करत आहे. त्यामुळे त्याला नेमकं काय झालं आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर आता भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल (Morne Morkel) याने अपडेट्स दिले आहेत.