

Naman Dhir Debut | India vs West Indies T20I
Sakal
India vs West Indies T20I Marathi News: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात मंगळवारपासून (६ ऑक्टोबर) टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. याआधी झालेल्या वनडे मालिकेत भारताने २-१ अशा फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे टी२० मालिकेतही असेच वर्चस्व राखण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल.
भारतीय टी२० संघ नुकताच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ही मालिका खेळण्यासाठी उतरला आहे, त्यामुळे भारतीय संघाचा फॉर्म चांगला आहे. पण वेस्ट इंडिजनेही वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला पराभूत केल्याने त्यांच्याही आत्मविश्वासात भर पडलेली आहे आणि वेस्ट इंडिजचा संघ टी२० मध्ये चांगला खेळ करतो, त्यामुळे त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही.