IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

India vs West Indies 2nd ODI, Live Streaming Details: भारत आणि वेस्ट इंडिज संघात दुसरा वनडे सामना गुवाहाटीला होणार आहे. हा सामना कुठे आणि कधी पाहाता येईल जाणून घ्या.
India vs West Indies

Team India

Sakal

Updated on: 

Where to Watch India vs West Indies, 2nd ODI: फलंदाजी भारताची नेहमीच ताकद राहिली आहे; मात्र स्थैर्य नसलेली वेगवान गोलंदाजीची रचना चिंतेचा विषय आहे. त्यावर मार्ग काढण्याची पुन्हा एकदा संधी वेस्ट इंडीजविरुद्ध आज होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून मिळणार आहे. या सामन्यातही वर्चस्व गाजवून मालिका जिंकण्याच्या दृष्टीने भारताचे पारडे जड आहे.

गुवाहाटीतील प्रेक्षकांसाठी विराट कोहली पुन्हा एकदा केंद्रबिंदू असणार आहे. तिरुअनंतपुरम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करून विराटने आपली हुकूमत सिद्ध केली होती. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलनेही शतक केले होते. त्यामुळे भारताने २९६ धावांचे आव्हान ४२ षटकांच्या आतच पूर्ण करून एकतर्फी विजय मिळवला होता.

India vs West Indies
IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com