IND vs WI: २ शतकं, २६१ धावा...! 'शे होपला रोखणं होतं कठीण...' कर्णधार अय्यरनेही केलं मान्य; वैभव सूर्यवंशीला न खेळवण्याबद्दल म्हणाला...

Shreyas Iyer Opens Up on Vaibhav Sooryavanshi & Shai Hope: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. या मालिकेत शे होपनं २६१ धावांसह मालिकावीर पुरस्कार जिंकला. या मालिकेत वैभव सूर्यवंशीला मात्र संधी मिळीली नाही, याबाबत श्रेयस अय्यर काय म्हणाला, जाणून घ्या.
Shreyas Iyer Opens Up on Vaibhav Sooryavanshi & Shai Hope

Shreyas Iyer Opens Up on Vaibhav Sooryavanshi & Shai Hope

Sakal

Updated on: 

Shreyas Iyer Opens Up on Vaibhav Sooryavanshi: भारत आणि वेस्ट इंडिज संघात नुकतीच टी२० मालिका झाली, जी २-२ अशी बरोबरीत सुटली. शनिवारी (१७ ऑक्टोबर) शेवटचा आणि पाचवा सामना पावसामुळे रद्द झाला. आता भारताला न्यूझीलंड दौऱ्यावर जायचे असून २२ ऑक्टोबरपासून ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे.

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध आणि त्याआधीही अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला खेळवण्यात आले नव्हते. तो १५ जणांच्या संघाचा भाग होता, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.

Shreyas Iyer Opens Up on Vaibhav Sooryavanshi & Shai Hope
IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com