T20 World Cup: संजू सॅमसनला संधी मिळणार? पण, त्यासाठी अभिषेकसह तीन खेळाडू रडारवर; कोणाची विकेट पडणार?

Sanju Samson Set for T20 WC Return: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यांनंतर संजू सॅमसनला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
Sanju Samson | T20 World Cup 2026

Sanju Samson | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी (२२ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. हा सुपर - ८ मधील सामना असल्याने भारताला हा पराभव महागात पडू शकतो.

आता सुपर-८ मधील उर्वरित दोन्ही सामने भारतासाठी 'करो वा मरो' असेच आहेत. त्यातच भारतीय संघाला (Team India) स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच अभिषेक शर्मा, तिलक वर्मा यांच्या फॉर्मचीही चिंता सतावत आहे. याशिवाय रिंकू सिंगही फार काही खास करू शकलेला नाही.

<div class="paragraphs"><p>Sanju Samson | T20 World Cup 2026</p></div>
IND vs SA: कधीकधी अतिशहाणपणा नडतो...! अजिंक्य रहाणे प्रचंड संतापला; भारतीय संघाच्या पराभवावर म्हणाला, तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com