

India vs Zimbabwe T20 World Cup
sakal
चेन्नई : टी-२० विश्वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून भारतीय संघाने त्यांच्या क्षमतेला संपूर्ण न्याय देणारा खेळ केला नाही. साखळी स्पर्धेतील सर्व सामने बऱ्यापैकी आरामात जिंकले तरी समोरच्या कमी ताकदीच्या संघांनी भारताला लढत दिली होती. संघ व्यवस्थापन नेहमीप्रमाणे काळजी करण्यासारखे काही नाही हेच पालुपद लावत होते.