IND vs ZIM 3rd T20I: भारताचा झिम्बाब्वेला व्हाईटवॉश! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर मयंक यादव-यश ठाकूरच्या माऱ्यासमोर यजमान गारद

India win 3rd T20I vs Zimbabwe: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध रविवारी तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेतही निर्विवाद वर्चस्व ठेवले. तिसऱ्या सामन्यातील विजयात वैभव सूर्यवंशी, मयंदक यादव आणि यश ठाकूर यांनी मोलाचा वाटा उचलला.
India vs Zimbabwe 3rdT20I

India vs Zimbabwe 3rdT20I

Sakal

Updated on

Zimbabwe vs India, 3rd T20I Marathi Cricket News: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाने झिम्बाब्वेला टी२० मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला आहे. रविवारी (२६ जुलै) झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने ३५ धावांनी सहज विजय मिळवला आणि मालिकेतही निर्विवाद वर्चस्व ठेवले.

भारताच्या या विजयात वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi), मयंक यादव (Mayank Yadav) आणि यश ठाकूर (Yash Thakur) यांनी मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला २० षटकात ७ बाद १५७ धावाच करता आल्या. रायन बर्लने अर्धशतक करत झुंज दिली, पण त्याची झुंज अपयशी ठरली.

India vs Zimbabwe 3rdT20I
IND vs ZIM: पहिलाच बॉल अन् वैभव सूर्यवंशीचा भारी झेल, गोलंदाज मयंक यादवची भुवनेश्वर कुमारच्या रेकॉर्डशी बरोबरी; पाहा Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com