

WOMEN'S ASIA CUP FINAL, IND vs SL
Sakal
WOMENS ASIA CUP FINAL INDIA vs SRI LANKS PLAYING XI: महिला आशिया कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय महिला विरुद्ध श्रीलंका महिला संघात दुबईत रविवारी होत आहे. सलग दुसऱ्यांदा या दोन संघात महिला आशिया कपचा अंतिम सामना होत आहे. यापूर्वी २०२४ मध्येही या दोन महिला संघात अंतिम सामना झाला होता, पण त्यावेळी श्रीलंकेने विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे श्रीलंका संघ यंदाही हे विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल, तर भारतीय संघ मागील पराभवाचा वचपा काढत पुन्हा विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल.